पाचोरा नगरपरिषदेत निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदाच एकाच प्रभागात पती-पत्नीचा विजयी गुलाल..
पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाचे शिवसेना शिंदे गट आमदार किशोर आप्पा पाटिल नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने पाचोरा नगरपरिषद आणि भडगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवला व एकहाती विजय मिळविला.
आज पाचोरा नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागला असून भाजप पक्षाला चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 07 चे उमेदवार अ जागेतील उमेदवार प्रवीण ब्राह्मणे व त्यांच्या पत्नी ब जागेतील उमेदवार वर्षा प्रवीण ब्राह्मणे यांचा विजयाची चर्चा जिल्ह्याभरात होत आहे. ब्राह्मणे पती पत्नी एकाच प्रभागात एकाच पक्षातून निवडून आले प्रवीण ब्राम्हणे यांनी माजी सभापती भाजपचे सतीश शिंदे यांचा पराभव केल्याने बंगल्यावाल्या विरोधात रस्त्यावरील उमेदवाराचा विजय झाल्याने चर्चा होतांना दिसून येत आहे.
*पत्रकार ते पेपर विक्रेता झाले आमदार किशोर पाटलांचे लाडके नगरसेवक, प्रविण ब्राम्हणे यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली तसेच पाचोरा रेल्वे स्टेशन परिसरात अनेक वर्षे पेपर विक्रेता हि राहिले अशा सघंरशाच्या प्रवाहातुन थेट दोघेही पती पत्नी एकाच प्रभागातुन गगनभरारी घेत पाचोरा नगरपरिषदेवर नगरसेवक म्हणून विराजमान झाले, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा,ॲड.कविता रायसाकडा यांनी पत्रकार दांपत्य यांना शुभेच्छा दिल्या आहेत.*
जनतेच्या समस्यांचे निवारण हेच आमचे लक्ष हा उद्देश ठेऊन आम्ही प्रभाग क्रमांक सात मधून निवडणुक लढलो आणि जिंकलो ही लढाई बंगल्यावाल्या विरोधात रस्त्यावरील व्यक्ती ची होतीअसे जिंकून आल्यावर प्रतिक्रिया प्रवीण ब्राह्मणे यांनी दिली. सामान्य व्यक्तिमत्व असणारे प्रवीण ब्राह्मणे हे आमदार किशोर आप्पा पाटिल यांच्या मार्जितले कार्यकर्ते म्हूणन ओळख आहे. पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत चांगलाच ट्विस्ट आला होता.

0 Comments