*बाळद परिसरात बिबट्याचे दर्शन पाचोरा वनविभागाने घेतली दखल* 




बाळद ता पाचोरा आज दि.12/1/2026 दुपारी 12 वाजेच्यादरम्यान गावापासून जवळच असलेल्या सुरेश गंगाराम पाटील करमुडकर यांच्या पाचोरा चाळीसगाव रस्त्यालगत असणाऱ्या शेतात भर दिवसा बारा वाजेच्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झाले गट नंबर 346 वडगाव शिवार असे असून सुरेश गंगाराम पाटील हे त्यांच्या केळीच्या शेतात केळीचे घड झाकत असताना अचानक त्यांना खडबड आवाज आलासता त्यांनी आवाजाच्या दिशेने बघितले.त्याना अचानक  बिबट्याचे दर्शन झाले   ते  एकदम भांबावून  गेले व त्यांनी एकदम आरडा ओरड केला कारणाने बिबट्याने केळीच्या बागेतून धूम ठोकली व जवळच असणाऱ्या मुलांच्या रनिंग ग्राउंड वरून नदी काठालगत वडगाव शिवाराकडे पळ काढला यादरम्यान गावात वाऱ्यासारखी बातमी पोहोचून संपूर्ण गावातील तरुण सुरेश गंगाराम पाटील यांच्या शेताजवळ आले व सर्वांनी पाहणी करत चौकशी केली त्याच वेळेस गावचे पोलीस पाटील नितीन पाटील यांनी  वन विभागाला फोनवरून माहिती दिली वनविभागाचे कर्मचारी वनरक्षक प्रमिला अंभोरे व वनरक्षक खतीजा शेख यांनी येऊन ठशांचा खातरजमा करण्यासाठी  त्याचे फोटो घेऊन वरिष्ठांकडे पाठवले आहेत पुढील कारवाई ते करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली