*विवेकानंद अभ्यासिकेतील*
*जयकुमार राजपुत = मा. जि.प. सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब (जिभु) पाटील यांच्या कडुन सन्मानित*
आखातवाडे येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतील नवतरुण युवक *जयकुमार रविंद्रसिंग राजपूत* यांची *केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)* मध्ये यशस्वी निवड झाली आहे. कठोर परिश्रम,सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर जयकुमार राजपूत यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल *मा.जि.प.सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब (जिभू) पाटील* यांच्या हस्ते जयकुमार राजपूत यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना त्यांनी जयकुमार राजपूत यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व ही निवड परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
याप्रसंगी ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.

0 Comments