*फिर्याद द्यायला आलेल्या तरुणीवरच पोलिस उपनिरीक्षक चव्हाणने केला बलात्कार*
छत्रपती संभाजीनगर=मोबाईल हरवल्याची तक्रार घेऊन आलेल्या २३ वर्षीय मुली सोबत ५७ वर्षाचा पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाणने मैत्री केली. यानंतर विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यातून ती गर्भवती राहताच तीन वेळा गर्भपात करण्यात आला यात कुटुंबाने तरुणीला मारहाण केल्यानंतर तिने पोलिसाकडे धाव घेतली. त्यावरून गुरुवारी बलात्कार ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित तरुणी 7 मार्च 2025 रोजी क्रांती चौक ठाण्यात मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेली होती. 17 मार्चला मोबाईल सापडल्या चे सांगून चव्हाणने संबंधित तरुणीला हॉटेलमध्ये बोलावले.
तिच्यासोबत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले त्यानंतर सातत्याने भेटत राहिला जून 2025 मध्ये तरुणी गर्भवती राहिल्याचे कळल्यानंतर चव्हाणने तातडीने तिला पुण्यात गर्भपात घडवून आणला.
*चव्हाणच्या पत्नी, मुलाकडून तरुणीला मारहाण*
ती दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्यानंतर चव्हाणची पत्नी नर्मदा, मुलगा सागरने गर्भपात करण्यासाठी तिला मारहाण केली 18 जानेवारीला तरुणी न्यायालयात गेली.
तेव्हा चव्हाण तिला तेथे धमकावले त्यामुळे संतप्त तरुणीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे या प्रकरणी तक्रार केली.
त्यावरून चव्हाण सह त्याची पत्नी मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख अधिक तपास करीत आहेत.

0 Comments