*चाळीसगाव वकिलावर न्यायालय परिसरात जीवघेणा हल्ला*

*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार= प्रदेश उपाध्यक्ष= किशोर रायसाकडा*



चाळीसगाव (सोनु परदेशी)= शहरातील न्यायालय परिसरात शुक्रवारी दुपारी तीन वाजे दरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेने चाळीसगावात खळबळ उडाली. न्यायालयीन कामकाज सुरू असताना ॲड.समीर शेख यांच्यावर सात ते आठ अज्ञातांनी हल्ला करत शस्त्राने सपासप वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ॲड.शेख हे न्यायालयात परिसरात कामकाज करत असताना अचानक काही जण त्यांच्या जवळ आले.  त्यापैकी तिघांनी हातातील धारदार हत्याराने वार केले. हल्ला सुरू होताच न्यायालयात परिसरात एकच गोंधळ उडाला.प्रसंगाचे गांभीर्य ओळखून इतर वकील बांधव तात्काळ धावले आणि हल्लेखोरांच्या तावडीतून शेख यांची सुटका केली.या हल्ल्यात ॲड. शेख यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शेख यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.


*वकील बांधवांमध्ये संतापाची लाट*

न्यायालयासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात भर दिवसा झालेल्या या प्रकारामुळे वकील बांधवांमध्ये संतापचे लाट उसळली आहे. चाळीसगाव न्यायालयातील वकिलांनी एकत्र येत या घटनेचा नोंदविला असून वकिलांना संरक्षण देणारा स्वतंत्र कायदा तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली नसल्याचे सांगण्यात  आले.

तसेच मागिल आठवड्यात चाळीसगाव येथील धडक बेधडक पत्रकार महेंद्र सुर्यवंशी यांच्या मोबाईल मध्ये काही अधिकाऱ्यांच्या पोलखोल व्हिडिओ होते ती पोलखोल होवू नये म्हणून काही अज्ञातांना लावून पत्रकार महेंद्र सुर्यवंशी यांचा मोबाईल लांबविण्यात आला. हा महाभयंकर हुकुमशाह प्रकार चाळीसगावात सुरू असल्याचे सांगितले जाते आहे.

वरिल दोघेही घटना  संदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी कळविले आहे.